You are currently viewing १५० फूट खोल दरीत जीप कोसळून, ५ मजुरांचा मृत्यू

१५० फूट खोल दरीत जीप कोसळून, ५ मजुरांचा मृत्यू

नंदुरबारमध्ये जीप दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या जिल्ह्यातील तोरणमाळ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी घाटात हा अपघात झाला आहे. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणारी जीप सुमारे १५० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतक हे नंदुरबार जिल्ह्यातील झापी फलाई गावचे निवासी आहेत. हे सर्व मजूर असून ते तोरणमाळ येथे आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जात होते आणि त्याच दरम्यान खडकी घाटात जीपला अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीप खडकी घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप सुमारे १५० फूट दरीत कोसळली.

नंदुरबारचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, या अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 13 =