दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र. 178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
दाजीपुर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक खाली नमुद केल्याप्रमाणे अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे –
दाजीपुर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन हलक्या व लहान वाहनांकरीता वालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपुर रस्ता प्रजिमा 29 चा वापर करावा. तसेच अवजड व मोठी वाहतुक या रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातुन कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी. तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली- आजरा- गडहिंग्लज व संकेश्वर-गडहिंग्लज- आजरा-आंबोली अशी वाहतुक वळविण्यात यावी, असेही या अधिसुचनेव्दारे कळविण्यात आले आहे.