You are currently viewing मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न

मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न

*मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न*

प्राचार्य सेवा संघ मुंबई द्वारा आयोजित सरस्वती सूत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन सेवासदन सोसायटीचे रमाबाई नवरंगे अध्यापिका विद्यालय, मुंबई-07 येथील मलबारी सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी, श्री. सत्यवान रेडकर सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमप्रसंगी शिक्षक व विविध शैक्षणिक संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. सत्यवान यशवंत रेडकर सरांचे शुभहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी आपल्या अमोघ वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. आपल्या जीवनप्रवास उलगडताना त्यांनी सर्वांना यश प्राप्ती साठी प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे असे सांगितले किंबहुना मी त्याचे वास्तविक उदाहरण आहे असं ही म्हटले. येत्या भविष्यात विविध शैक्षणिक संकुलात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन निशुल्क प्राप्त होईल अशी त्यांनी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवासदन अध्यापक विद्यालयाच्या प्रा.मानकर मॅडम, प्रास्ताविक प्राचार्य गायकवाड ताराबाई मोडक, दादर, प्रमुख पाहुणे स्वरूपात रेडकर सरांचा परिचय, प्राचार्य विष्णु देसले सर, सेवासदन काॅलेज, ग्रॅंटरोड यांच्यामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्या, मैमुना मॅडम,एक.के.आय.कुर्ला यांच्यामार्फत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा