सबनीसवाडा एकमुखी दत्तमंदिर येथे ”भक्तनिवास व सुशोभीकरण” काम मंजूर
आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी भूमीपूजन
सावंतवाडी
श्री दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्याकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ”भक्तनिवास व सुशोभीकरण” काम मंजूर झालेले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आम. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
श्री एकमुखी दत्तमंदिर परिसर, सबनीसवाडा, सावंतवाडी येथे शनिवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ०९.४५ वा. या सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर व्यवस्थापन उपसमिती, सबनीसवाडा सावंतवाडीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी केले आहे

