You are currently viewing कॅमेर्‍यासोबतचं ..माझं जगणं..!

कॅमेर्‍यासोबतचं ..माझं जगणं..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतचं ..माझं जगणं..!*

 

निमित्तापुरतं यजमानपद कॅमे-याने

माझ्याकरता खुशीत स्विकारलं

करियर घडवण्याच्या नादात

स्वप्रतिबिंबांना गहाण ठेवलं…

 

आईचा वारसा जपतं

कॅमेर्‍यानेच मला सांभाळलं

बारा हत्तीचं बळ

बलदंड शरीरात ओतलं..

 

कौतुकाच्या खैरातीचे दुष्परिणाम

कॅमेर्‍यासोबतच्या जगण्याने भोगलं

कृत्रिम भींतीना तोडून -तोडून

मर्जीनुसारचं आयुष्य …जगलं..

 

सुखी माणसाचा सदरा

कोटाने हिसकावून घेतला

घराण्याची पुण्याई पाठीशी

अतिआत्मविश्वास लेन्समधून नडला

 

कॅमेर्‍याला बिलगणारी बोटं

आठवणींनी कधीकधी थरथरतात कॅमेर्‍यासोबतच

रूबाबदार आयुष्य जगतांना

सन्मानाच्या पायघड्या उलगडतात

 

बाबा ठाकूर धन्यवाद

कॅमेर्‍यासोबतच माझं..जगणं

सत्तेचाळीसावी..ठाकूरी उवाच सात

प्रतिक्रिया व्यक्त करा