You are currently viewing राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या प्रार्थना नाईक या विद्यार्थिनीने पटकावला प्रथम क्रमांक

राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या प्रार्थना नाईक या विद्यार्थिनीने पटकावला प्रथम क्रमांक

*राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या प्रार्थना नाईक या विद्यार्थिनीने पटकावला प्रथम क्रमांक :**

सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या इयत्ता तिसरी मधील कु. प्रार्थना प्रणय नाईक हिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशालेत चित्र काढून ते जिल्हा महिला अध्यक्ष पूजा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष पुजा सोनसुरकर, महिला तालुका अध्यक्ष संचिता गावडे व सावंतवाडी शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर या मान्यवरांकडे जमा करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शालेय विद्यार्थ्यांकरिता स्पर्धेचे दोन गट जाहीर करण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ५ वी पहिला गट व इयत्ता ६ वी ते ९ वी दुसरा गट असे दोन गट करण्यात आले. पहिल्या गटासाठी ‘ निसर्ग चित्र’ व दुसऱ्या गटासाठी ‘स्वच्छता अभियान स्वच्छ शाळा सुंदर शाळा ‘ हे विषय देण्यात आले होते. इयत्ता १ ली ते ५ वी या पहिल्या गटात प्रशालेतील ‘ कु. प्रार्थना प्रणय नाईक ‘ हिने प्रथम क्रमांक पटकावला. हिला गुलाब पुष्प व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कु. प्रार्थना नाईक हिला तिच्या पालकांचे तसेच प्रशालेतील चित्रकला विषयाच्या शिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा