You are currently viewing 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर अधारीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

                प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्ह्यात दि. 1 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील 268 – कणकवली, 269 – कुडाळ व 270 सावंतवाडी या विधानसभा मतदार संघाचा, छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कालावधीत प्राप्त दावे व हरकरती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी निकालात काढून, स्वीकृत अर्जाची नोंद तसेच मयत, स्थलांतरीत व दुबार मतदार नोंदीची वगळणी प्रत्येक मतदार संघाच्या ठिकाणी इरोनेट (ERONET)  या संकणक प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी व मयत, स्थलांतरीत व दुबार मतदारांची वगळणी करुन तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी दि. 5 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी, तहसिलदार कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय ( निवडणूक शाखा) येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

                www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व नव्याने नोंद झालेले मतदार यापूर्वी नोंदणी झालेल्या मतदारांना Voter Helpline App वर किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावर आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाल्याची खात्री करता येईल.

                दिनांक 16 जानेवारी 2021 ते दि. 5 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 764 मतदारांची वगळणी करण्यात आली. तसेच सदर कालावधीत 19 हजार 774 मतदारांची नमुना नं 6 अर्ज स्वीकारून नव्याने नांव नोंदणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या मतदार संख्येत निव्वळ वाढ ही 1 हजार 10 इतकी झाली आहे. यात प्रमुख्याने 7 हजार 702 फोटो नसलेल्या मतदारांपैकी 774 मतदारांचे फोटो गोळा करुन मतदार यादीत अद्ययावत करण्यात आले व उर्वरीत 6 हजार 928 मतदारांची नमुना नं 7 भरुन वगळणी करण्यात आली.

                दि. 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत 297 टंकलेखनीय त्रुटी असल्याने सदर त्रुटीचे नराकरण करुन मतदार यादी पुर्णपणे त्रुटी विरहीत करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये फोटो विरहीत एकही मतदार शिल्लक नाही.

                दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात 12 हजार 649 छायाचित्र समान नोंदी आढळून आल्या आहेत. सदर मतदारांना नोटीसा जनरेट करण्याची व नमुना नं 7 ने वगळणी करण्याची कार्यवाही सुरू असून अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 200 समान नोंदी आढळून आल्या आहेत. सदर नोंदी असलेल्या मतदारांना नोटीसा बजावून वगळणी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

                सद्यस्थितीत जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये एकूण 3 लाख 35 हजार 459 पुरुष असून 3 लाख 37 हजार 363 महिला असे एकूण 6 लाख 72 हजार 822 मतदार आहेत.

                मतदार याद्या अद्ययावत करण्याची कार्यवाही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये चालु ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्यामार्फत सुरू राहणार आहे. नागरिकांनी मतदार यादीमध्ये त्यांची दुबार नावे नोंदविली असल्यास, तसेच त्यांच्या कुटुंबातील मतदार यादीमध्ये नाव असलेले सदस्य मयत असल्यास तसेच एखादा सदस्य अन्य मतदार संघामध्ये स्थलांतरीत असल्यास, त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याबाबत नमुना 7 भरुन संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे द्याव्यात. तसेच नवीन नाव दाखल करताना पूर्वीच एखाद्या मतदार संघामध्ये नाव दाखल असल्यास त्याचा तपशिल नमुना 6 भाग क्र. 4 मध्ये नमुद करुन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करावेत. त्याचप्रमाणे ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही, त्यांनी त्यांचे पासपोर्ट आकारमानाचे छायाचित्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडे अथवा गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावीत असे आवाहनही यात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा