You are currently viewing अवीट अमृत बोली

अवीट अमृत बोली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अवीट अमृत बोली* 

 

मला आवडते हसरी माझी आई

मला आवडते तशी मराठी माई ||१||

आई मराठी माई सांगाती होऊनी

अमृतची पाजी शुद्धरस गाऊनी ||२||

अशा मैत्रीची अवीट गोडी चाखूनी

असे लळा मातेचा मातृभाषेतूनी ||३||

गोमातेच्या दुधावरी साय पाहूनी

मोह ना कुणा असा असेल का कुणी ||४||

मऊमलई मधाळ भाषा शिकूनी

पैजेत पुढे ही अभंग गोडीतूनी ||५||

मातृभाषा असे ही सुख संवादिनी

वारसा मोडीत अभिजात जपूनी ||६||

आली अभिनव आता मोडी जाऊनी

अभिजात अभिनव सदा जपूनी ||७||

सत्तावीस फेब्रुवारी या भाषादिनी

भाषा संवर्धन हे करु संकल्पूनी ||८||

प्राथमिक ते पूर्ण माध्यमिक ज्ञानी

सक्तीने ही अभिजात मराठी मानी ||९||

महाराष्ट्र बोलतोय खडसावूनी

जयकार नकॊ मज भाषा त्यागूनी ||१०||

कसले हे राजकारण कारस्थानी

त्यांचीच मुले जाती आंग्लभाषा स्थानी ||११||

अभिजात मी अभिप्रेत भले ज्ञानी

शाळांत मराठी प्रथम भाषा स्थानी ||१२||

लिहिते व्हा बोलते व्हा रे सभ्यस्थांनी

माझी मराठी विश्वात हो उच्च स्थानी ||१३||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. वेंगुर्ला,

जि. सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा