You are currently viewing संत सोहिरोबा नाथ सेवा समितीने इन्सुली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारले सायकल स्टॅन्ड

संत सोहिरोबा नाथ सेवा समितीने इन्सुली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारले सायकल स्टॅन्ड

सावंतवाडी :

इन्सुली येथील विद्या विकास संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सायकली खराब होऊ नयेत, यासाठी संत सोहिरोबा नाथ सेवा समितीने विद्यालयाच्या आवारात सायकल स्टॅन्ड उभारले आहे. 27 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते या सायकल स्टॅन्डचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सेवा समितीचे ज्येष्ठ सेवेकरी शिवाजी पालव, संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य मंगल कामत, मोहन जाधव, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार राजेश नाईक, शैलेश मयेकर, संजय पिळणकर तसेच पत्रकार नरेंद्र देशपांडे, प्रसन्न गोंदावळे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, दिव्या वायंगणकर, विद्या विकास संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, संचालक अजय कोठावळे, सचिन दळवी, विकास केरकर, मयूर चराठकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष सुरेश गवस, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बंड्या हळदणकर, सचिन सावंत, मुख्याध्यापिका सुविधा केरकर, उपमुख्याध्यापक संजय शेवाळे, सहाय्यक शिक्षक दिगंबर मोर्ये, सचिन पालकर, विनोद चव्हाण, चंद्रलेखा परब, तसेच स्पर्धेचे परीक्षक श्रीमती गौरवी पेडणेकर, श्री. गुरूंनाथ नार्वेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा