You are currently viewing गुलाबस्तवन…!!

गुलाबस्तवन…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन…!!*

 

सजून धरा कधीची

वाट पाहते तुझी

ओथंबून अंकुरला रसरंग

माया भुलवते तुझी…

 

मूळमाया अंतमृख करी

सुखसाजणं रंगलावण्य पिऊन

भावपंचमाचा सूर लावलास

लाजलास लावण्यात न्हाऊन ..

 

कायेत शृंगाराचा बाज

ईश्वरासोबत जाऊन बसलास

स्पर्शाच्या पालवीत आनंदविभोर

प्रीती अभ्रांकित…. जगलास..

 

कैवल्याचा राजा…. तू

भासतो शब्दांच्या पलिकडे

सुटल्या रेशमीदुकूल गाठी

अंगणी आलास माझ्याकडे..

 

सगुण सौंदर्य साकारून

मधाळ रूपाचा आभास

कैवल्याचा खेळलासं रास

सुंदर तुझा प्रवास…

सुंदर तुझा प्रवास..!!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा