हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न
हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने रविवार दि 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम अगदी प्रचंड गर्दीत नुकताच संपन्न झाला. यावेळी कलानिधी ठाणे पैठणी साडी सौजन्य सौ सुजाता राहुल बंगे यांच्या सौजन्याने मानकरी सौ झोरे तेंडोली हीने पटकावली तर दुसरा क्रमांक सोन्याची नथ सौ अर्चना अतुल बंगे हीच्या सौजन्याने सौ परब पाट हीने पटकावली तर तिसरा क्रमांक मिक्सर सौ प्रभु मैत्रेय सेंद्रिय खत बांधकोडवाडी यांज कडुन तर चौथा क्रमांक सौ वल्लरी दीवाकर मांजरेकर हीच्या कडुन कुकर तर पाचवा क्रमांक कै अलका गंगाराम परब यांच्या स्मरणार्थ श्री सदाशिव गंगाराम परब यांज कडुन पंखा तर उत्तेजनार्थ प्रत्येक सहभाग स्पर्धकाला आकर्षक भेट वस्तू देण्यात आली यावेळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा खेळ श्री उमेश परब यांनी घेऊन उत्कृष्ट खेळुन एक नविन खेळ खेळण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात श्री फळ वाढवुन सरपंच तथा अध्यक्ष श्री देव रामेश्वर उपसल्लागार समिती श्री अमृत देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मान्यवर उपस्थित होते