You are currently viewing अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक

अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक

*अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक*

*शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध*

*चुकीच्या कारवाई विरोधात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा*

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर व राष्ट्रवादी युवक (श. प.) कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी काढले आहेत. राजकीय आकसापोटी आणि राजकीय दबावाखाली हि हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज कणकवली उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला.
चुकीच्या पद्धतीने केलेल्या हद्दपारीच्या कारवाई विरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना दिला आहे. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तेजस राणे, रोहित राणे, चंद्रकांत परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा