You are currently viewing पळसंब येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार- आ. वैभव नाईक

पळसंब येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार- आ. वैभव नाईक

पळसंब नवीन तलाठी कार्यालयाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन

नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपतकालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे तलाठी हा गावाचा केंद्रबिंदू असतो.पळसंब गावात नवीन तलाठी सझा सुरु झाल्याने ग्रामस्थांना याचा लाभ होणार असून त्यांची गैरसोय आता दूर होणार आहे.असे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.


आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील पळसंब येथे नवनिर्मित तलाठी कार्यालयाचे उदघाटन आज करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तर तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते फित कापण्यात आली.आठवड्यातून २ दिवस याठिकाणी तलाठी संतोष अरकराव उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेच्या २० लाखाच्या निधीतून पळसंब जयंतीदेवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवेचे भूमिपजून सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांनी हळदीकुंकू समारंभ आयोजित करत महिलांना फुलझाडांचे वाटप केले. गोलतकर यांनी गावात केलेल्या कार्याची आठवण करून देत आ. वैभव नाईक यांनी त्यांचे कौतुक केले.

तलाठी कार्यालय उदघाटन प्रसंगी तहसीलदार अजय पाटणे, सरपंच चंद्रकांत गोलतकर, पंचायत समिती माजी उपसभापती अशोक बागवे, शिवसेना शाखा प्रमुख पिंटू सावंत, नवनिर्वाचित पळसंब तलाठी संतोष अरकराव, मंडळ अधिकारी सुनील पवार,श्री. पाटील, रामगड तलाठी वैशाली कदम, आचरा तलाठी अनिल काळे, श्रावण दिनेश तेली, ग्रा. प. सदस्य एकनाथ चिंचवलकर,सीमा चव्हाण, प्रणिता पुजारे, शैलेंद्र अणावकर, भिकाजी पळसंबकर, महेश पळसंबकर, स्वप्नील पळसंबकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =