शिवजयंती च्या पावन पर्वावर दि. १९ फेब्रुवारी बुधवारी रोजी अंचरवाडी येथे उपस्थित मान्यवर व गावकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली व प्रतिमा पुजन केले.यावेळी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी हजर होते.
श्री शिवाजी माध्यमिक आश्रम शाळा अंचरवाडी येथे छत्रपती शिवराय यांना अभिवादन करण्यास व प्रतिमा पूजन करण्यास आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. डब्ल्यु चव्हाण यांनी शिव जयंती चे औचित्य साधून सकाळीच शिव प्रतिमा पूजन केले. या वेळी इंडियन पोलीस मित्र मंडळाचे जिल्हा अध्यक्ष समय कुमार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवराय यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. उपस्थित शिक्षक वृंद यांनी सुद्धा प्रतिमापूजन केले. त्यामध्ये आश्रम शाळेचे शिक्षक प्रशांत राठोड, एस. डी. चव्हाण सर एन पी राठोड, विखार सर, तसेच मयुर बुंदे, सह कर्मचारी बबन राठोड, भागवत जवंजाळ कैलाश जवंजाळ, ओ डी इंगळे,शालूबाई बोंडे, हरि गव्हाळे आदी उपस्थित होते.