You are currently viewing राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

सिंधुदुर्ग मधून पाटील दाम्पत्याचा उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मान

बांदा

नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नुकताच पुणे येथे अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला.
संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शिक्षण उपसंचालक विकास गरड,उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे, शिवाजी खांडेकर, सचिन डिंबळे, बाळकृष्ण चोरमले,सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह ,सानेगुरुजी स्मारक पुणे येथे संपन्न झाले.
या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांदा नं.१ केंद्रशाळेचे उपक्रमशिल शिक्षक जे.डी.पाटील यांचा नियमितपणे शाळेत घेण्यात येणाऱ्या पाचवी शिष्यवृत्ती सराव पेपरमध्ये 200गुण मिळवा व 2रूपये मिळवा या उपक्रमाचा समावेश आहे हा उपक्रम शाळेत मागीलवर्षी त्यांनी राबविला होता व या उपक्रमामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण व जिल्हा शिष्यवृत्ती धारक बनले . सावंतवाडी तालुक्यात ही २६६गुण मिळवत विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला.
तर कास शाळेच्या उपशिक्षिका स्वाती पाटील यांचा पक्का पाया शिष्यवृत्तीचा याही उपक्रमाचा समावेश या पुस्तकात असून त्यांनी पहिलीपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून उपक्रम यशस्वी पार पाडला आहे त्यामुळे या शाळेचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व विविध स्पर्धात्मक उपक्रमात यशस्वी ठरले आहेत.
पाटील दाम्पत्याच्या अविरत ज्ञानसेवेबद्दल व राबवत असलेल्या अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


याच बरोबर या पुस्तकात बळीराम जाधव अहमदनगर,संतोष गवळी अहमदनगर, प्रदीप विघ्ने नागपूर, प्रमिला गावडे अहमदनगर, दिपाली लोखंडे पुणे, ध्रुवास राठोड जळगाव ,शंकर चौरे धुळे, लता गवळी अहमदनगर , किसन फटांगडे अहमदनगर,गितांजली माथनकर यवतमाळ,रफत इनामदार पुणे, नेहा गोखरे यवतमाळ, रोहिणी गायकवाड बीड, उज्वला फटांगरे पुणे, सोपान बंदावणे पुणे ,सदानंद कांबळे रत्नागिरी, आयुब शेख पुणे , वसुधा नाईक पुणे, सीमा बोजेवार यवतमाळ, चित्रा गोतमारे यवतमाळ, रुकसाना शेख पुणे, बापू चतुर नाशिक, सुप्रिया चोरघे पुणे ,वैशाली काळे पुणे, मीनल पाडावे ठाणे, सरला गावडे अहमदनगर, हर्षदा चोपणे यवतमाळ ,सतिश मुणगेकर रत्नागिरी, संजय पवार रायगड, सुहास दोरुगडे रत्नागिरी ,रूपाली पाटील रत्नागिरी ,शितल मदने पुणे, अनिता रहांगडाले भंडारा ,विजय वाघमोडे रत्नागिरी, संगीता म्हस्के पुणे ,लता साळवे औरंगाबाद ,करुणा गावंडे चंद्रपूर ,वैशाली पाटील पालघर, तिरूमला माने पुणे, हेमलता चव्हाण पुणे ,स्मिता पाबरेकर रायगड ,सुनिता निकम अहमदनगर,जया कुलथे अहमदनगर, मीनाक्षी नागराळे वाशिम,बंडोपंत नजन पुणे, विजय माने पुणे,झुंबर कदम पुणे,वनिता मस्कर पुणे या उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमाचा समावेश या पुस्तकात आहे. राज्यातील शिक्षक व विद्यार्थी या प्रेरणादायी असलेल्या या उपक्रमांच्या पुस्तकाचे महाराष्ट्रभर स्वागत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 16 =