*शिवजयंती निमित्त सत्कवी आणि भावकवी यांचा तळेगाव येथील चंद्रकिरण संस्थेत अखंड काव्यजागर*
*19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधुन तळेगाव दाभाडे येथे कविवर्य सतीश साठे आणि वैशाली साठे यांनी त्यांच्या ” हृदग्त ” या वास्तूत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये *महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक , व्याख्याते आणि प्रसिद्ध भावकवी वि.ग.सातपुते तसेच मराठी आणि संस्कृतचे गाढे ज्येष्ठ अभ्यासक सत्कवी मा.प्राचार्य सू.द . वैद्य सर यांचा 24 तास अविस्मरणीय असा प्रासादिक काव्यजागर झाला.* उभयतांनी आपल्या अनेक कवितांचे सलग सादर करून उपस्थित समस्त कविवरांना तृप्त मंत्रमुग्ध केले.
या अनौपचारिक काव्यसंमेलनात उपस्थित कवी/कवयित्री यांनी आपल्या रचनादेखील सादर केल्या.
प्राचार्य सू. द .वैद्य तसेच भावकवी विगसा उर्फ आपा यांनीही काव्यप्रतिभा , काव्यानुभूती , याबाबत आपली मनोगते व्यक्त करून कविता ही जगावी लागते आणि तिचे भावस्पर्शी सादरीकरण करावे लागते तरच ती श्रोत्यांच्या काळजाला भिडते असे सांगून *काव्य हा साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार असून लेखन ही प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आणि शब्दसामर्थ्याने भारावून टाकणारी कला आहे , तपस्या आहे. आणि ती केली तरच समाजप्रबोधन करणारी , अंतर्मुख करणारी काव्यरचनेची निर्मिती होत असते अशी मते व्यक्त केली.*
या कार्यक्रमात सर्वश्री.. सर्वश्री ज्योती मुंगी , यशोधरा साठे ,
सौ.मीनाक्षी भरड , सौ. अनघा कुलकर्णी , सौ रश्मी थोरात , वैशाली जामखेडकर , चैताली कुलकर्णी , सौ. वर्षा सालियन , संगीता पवार , मेघा खळदे , अरुंधती देशपांडे , त्रिंबक बिनीवाले , दत्तात्रय मेढी , सौ.अर्चना मुरुगकर , जयवंत पवार , रेवा जोशी , श्रीकांत पेंडसे , किरण परळीकर , श्रीराम घडे आणि सतीश साठे यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या. आणि सुग्रास भोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
