महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी आबा खवणेकर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी आबा खवणेकर

सिंधुदुर्ग:-

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र, ‘कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष”पदी” निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार नुकतेच या बाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांनी आबा खवणेकर यांना दिले आहे.

आबा खवणेकर हे निर्भिड पत्रकार म्हणून सर्वदूर परीचित असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दैनिक सामना, तरुण भारत, पुढारी, रत्नागिरी टाईम्स, नव शक्ती, पुण्यनगरी आदी दैनिकाच्या माध्यमातून पत्रकारितेतील आपली निर्भिडता सिद्ध करत पत्रकारीते सोबतच सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यातही ‘कोकणचा तडाखा’ या आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सुमारे ३० च्या वर हाॅटसअॅप स्वतःचे समुह निर्माण केले असून, तसेच राज्यभरातील ७५० च्या वर हाॅटसअॅप ग्रुप ते जाॅईट असल्याने, त्याद्वारे देश विदेशा सह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, बातम्या अवघ्या काही मिनिटात या समूहातील सदस्यांपर्यत पोहचवत आहे. ‘कोकणचा तडाखा’ या सोशल मीडिया समुहाचे नाव राज्यात आज अग्रक्रमाने घेतले जात आहे.

आबा खवणेकर एक निर्भिड तसेच अन्यायाला वाचा फोडणारे असे पत्रकार असुन, “कोकणचा तडाखा” या मोठ्या सोशल मिडिया समुहाचे सर्वेसर्वा आणि त्यांचे पत्रकारीता क्षेत्रात व त्यासंबंधीच्या क्षेत्रातील लोकांशी, सर्व पक्षातील खासदार, मंत्री, आमदार यांचेसह ग्राम पातळीपासून केंद्र स्तरावरील लोकप्रतिनिधींशी तसेच सर्वच क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध असल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या बाबींचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदासाठी आबा खवणेकर यांची निवड केली आहे. तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे वृत्त जाहीर होताच राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आबा खवणेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तर कोकणातील ज्येष्ठ पत्रकार शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई(रजि.) च्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सक्रीय कार्यकारिणी मंडळ सदस्य असलेल्या शैलेश पालकर यांच्या नियुक्तीबद्दल कोकणात सर्वत्र स्वागत होत आहे. तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी खेड येथील चंद्रकांत बनकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ते आयबिएन लोकमत या न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत. त्यांचेही सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई(रजि.) च्या कार्यकारिणी बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार आबा खवणेकर यांची “सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष” पदावर नियुक्ती केली आहे. पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. तर चंद्रकांत बनकर यांची “रत्नागिरी जिल्हाध्यक्ष” पदी निवड केली आहे. वरील तिन्हीही जिल्ह्यातील पत्रकारांना “जिल्हाध्यक्ष” पदी नियुक्ती निश्चित केली असल्याचे नियुक्तीपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी नमूद केले आहे.

वेब मिडीया, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या प्रतिनिधींना या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई(रजि.) संघटनेत सभासद होता येणार असून 20 फेब्रुवारी 2021 रोजी ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन  आयोजित करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील पत्रकारांच्या समस्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांना अवगत करण्यात येणार असल्याने या संघटनेमध्ये रायगड जिल्ह्यासह कोकणातील पत्रकारांनी सभासदत्व स्विकारण्याचे आवाहन यावेळी नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर (मोबाईल क्रमांक:- ९४२३८३२८८६) यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा