सावंतवाडीत महाविद्यालयीन युवतीची गळफास घेत आत्महत्या
सावंतवाडी
शहरातील सबनिसवाडा येथे प्लॅटमध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेते आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात सततच्या एकटेपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे.
सावंतवाडी शहरातील महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्स मध्ये ही युवती शिक्षण घेत होती. ती मुळ दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव टाकवाडी येथील असून सावंतवाडी शहरात सबनीसवाडा येथे ती प्लॅटमध्ये एकटीच राहत होती. आई वडील हे दोघेही शासकीय नोकरीत कामाला होते मात्र वडिलांचेच अलीकडे निधन झाल्याने आई व भाऊ हे दोडामार्ग येथे राहत होते, महाविद्यालयीन शिक्षणामुळे ही युवती सावंतवाडीतील आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. आज दिवसभर ती घरी एकटीच असल्याने तिने खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला होता. बराचवेळ काहीच रूममधून प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांनी तीच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिलाही उत्तर मिळत नसल्याने संशय बळावला याबाबत त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा उघडल्यानंतर ती गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली.
घटनास्थळीच पोलीस निरिक्षक अमोल चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक, पोलिस महेश जाधव यांनी घटनास्थळी पंचनामा केला यावेळी तिने डायरीत आत्महत्येबाबत लिहिलेला मजकूर पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आला. एकटेपणाला कंटाळून तसेच परीक्षेत कमी मार्क पडले तर घरच्यांना काय वाटेल या कारणाने आत्महत्या करत असल्याचे लिहले आहे. माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी धरू असे त्यात म्हटले आहे आहे.दरम्यान तीचा मृतदेह पंचनामा करुन उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत