You are currently viewing शिवरायांचे पाळणागीत

शिवरायांचे पाळणागीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम पाळणा गीत*

 

*शिवरायांचे पाळणागीत*

 

बाळा जो जो रे

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||धृ.||

कुलभुषणा धर्म रक्षक हो

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||१||

रडण्यासाठी जन्म नाही तुझा

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||२||

जिजाई शिवाई पुत्र खरा तू रे

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||३||

राम कृष्ण तै बलभीम तू रे

सत्यधर्मी तान्ह्या जो जो रे ||४||

पवन अग्नी जलासारखा तू

गगन धरा तान्ह्या जो जो रे ||५||

अवधारा अन्याया करी दूर

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||६||

सत्तेचा हव्यास नको तुज

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||७||

चिरंजीव तू हो सन्मानी राजा

शिवबाळा तान्ह्या जो जो रे || ८||

शिव छत्रपती जनता जनार्दन हो

शिवबाळा तान्ह्या जो जो रे ||९||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा