भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका उपाध्यक्षपदी चंदन कांबळी

भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका उपाध्यक्षपदी चंदन कांबळी

 

कुडाळ

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी ओरोस येथे आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली व भाजपा युवा मोर्चा कुडाळ तालुका युवा मोर्चा ची तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.त्यामध्ये कुडाळ तालुका उपाध्यक्ष पदी कुडाळ येथील चंदन शरद कांबळी यांची निवड करण्यात आली व भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

व्यासपीठावर  भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाई सावंत,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,युवा मोर्चा संघटक सरचिटणीस संदिप मेस्त्री,कुडाळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, ओरोस मंडल तालुका अध्यक्ष श्रीपाद उर्फ पप्या तवटे,सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूलकर तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ओरोस येथे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा