You are currently viewing कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन द्या

कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन द्या

शिवसेनेच्यावतीने संदेश कवठणकर यांची वेंगुर्ले वीज वितरण अधिकारी मूळे यांच्याकडे मागणी

सावंतवाडी

कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीनेbसावंतवाडी तालुकाप्रमुख ओबीसी सेलचे संदेश कवठणकर यांनी वेंगुर्ले वीज वितरण अधिकारी .मूळे यांच्याकडे केली आहे आहे.

या निवेदनात कवठणकर यांनी म्हटले की, कवठणी गावात कित्येक दिवस वारंवार वीज समस्यां भेडसावत आहे. याचा परिणाम येथील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. कवठणी गावांसाठी सद्यस्थितीत एक वायरमन कार्यरत आहे. मात्र एखादी विजेबाबत समस्या द्यायची झाली तर वायरमन यांच्या फोन वर संपर्क होऊ शकत नाही किंवा त्यांचा फोन बंद असतो. तसेच गावात वायरमन कार्यरत असून सुद्धा सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे तेथील ग्रामस्थात नाराजीचा सूर आहे. कधी कधी वीज प्रवाह बंद झाल्यास गावातील ग्रामस्थांना अंधारात रहावं लागतं आहे. त्यामुळे कवठणी गावासाठी कायमस्वरुपी वायरमन देऊन गावातील समस्या दूर करावी,अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते सुधा कावठणकर, शिवसैनिक समीर सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा