*🚩 किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा 🚩*
*▪️दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत आयोजन*
आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शिवजन्मोत्सव निमित्ताने किल्ले निवतीवर बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी ह.भ.प. संदेश गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. वेदांत वेंगुर्लेकर यांने शिवचरित्र सादर केले. हेमांगी जोशी यांचे शिवराय व त्याकाळातील अर्थव्यवस्था यावर व्याख्यान झाले.
या वर्षीचा दुर्ग मावळारत्न पुरस्कार प्रसाद सूर्यकांत यांना यावेळी प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला बावीस दुर्गप्रेमी उपस्थित होते. सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.