You are currently viewing वेंगुर्ल्यात तुळस (सिध्दार्थनगर) येथे बुद्ध पौर्णिमा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

वेंगुर्ल्यात तुळस (सिध्दार्थनगर) येथे बुद्ध पौर्णिमा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

वेंगुर्ला:

वेंगुर्ल्यात सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस यांच्या विद्यमाने बुध्द पौर्णिमा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. त्यावेळी तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शनिवार दि.१४/०५/२०२२ रोजी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उदघाटक शंकर घारे – ग्रा.पं. सरपंच, सुशिल परब – ग्रा.पं. उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य,तुळस ग्रामस्थ उपस्थित होते.

रविवार दि.१५/०५/२०२२ रोजी महिलांसाठी होम निनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उदघाटक मनीष दळवी(सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष),विजय रेडकर(माजी.ग्रा.सरपंच तुळस)सूत्रसंचालन-नागेश नेमळेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

सोमवार दि.१६/०५/२०२२ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन करण्यात आले त्यावेळी उदघाटक संजय पडते,विद्याधर परब(सिंधुदुर्ग बँक संचालक),यशवंत परब (माजी पं. समिती सभापती)प्रमुख वक्ते प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर(बी.के.खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला)सूत्रसंचालन प्रा.सचिन परूळेकर(वेताळ प्रतिष्ठान संस्थापक तुळस)उपस्थित होते.

कोकणचा आइनस्टाइन कु.विजय दिनेश तुळसकर यांचा गायनाचा कार्यक्रम इंद्रधनू कलामंच दाभोली यांची एकांकिका सादर करण्यात आली.

महिला बचत गट व सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =