You are currently viewing ‘टाटा मेटँलीक्स पिंग आयर्न’ कंपनी सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषण

‘टाटा मेटँलीक्स पिंग आयर्न’ कंपनी सुरू करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी उपोषण

वेंगुर्ला :

रेडी गावातील बंद पडलेल्या टाटा मेटँलीक्स या पिंग आयर्न प्रकल्पाचा १०० एकर जागेवर रोजगार निर्मिती प्रकल्प शासनाने लवकर सुरु करावा. या मागणीसाठी रेडी गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ २६ जानेवारी रोजी सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण करणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यानी दिली.

याबाबतचे निवेदन सरपंच रामसिंग राणे यानी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले आहे. प्रांताधिकारी खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात, आमच्या रेडी गावात १९९१ मध्ये टाटा मेटँलीक्स या पिंग आयर्न उत्पादित करणारा प्रकल्प सुरु झाला होता. २०१२ पर्यंत हा प्रकल्प चालला. त्यानंतर कच्चा माल मिळत नसल्याने हा प्रकल्प पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे रेडीसह जिल्ह्यातील हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

हॉटेल व्यावसायिक, ट्रक वाहतूक करणाऱ्यांच्या व्यवसायावर मंदी आली आहे. हा प्रकल्प पूर्ववत सुरु होणे किंवा त्या ठिकाणी नवीन प्रकल्प सुरु होणे आवश्यक आहे. परंतु वेळोवेळी याबाबत पत्रव्यवहार करूनही दूसरा प्रकल्प अद्याप सुरु नसल्याने गावातील लोक बेकार राहीलेले आहेत. या ठिकाणी १०० एकर जागा आहे. जवळच कनयाळ तलाव आहे. या ठिकाणी शासनाने रोजगार निर्मिती प्रकल्प आणावा यासाठी २६ जानेवारी रोजी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + fourteen =