माजगाव येथे दुचाकी अपघातात युवक जखमी
सावंतवाडी
मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील माजगाव कासारवाडा येथे रस्त्यालगत गटारात जखमी होऊन बेशुद्ध वस्तीत पडलेला दुचाकीस्वार काही जणांच्या निदर्शनास आला. मंगळवारी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी जखमीला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सागर सावळ ( २३, रा. रामनगर, बांदा ) असे या युवकाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोवा बांबोळी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे.