You are currently viewing सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि श्री मार्गेश्र्वर क्रिडा मंडळ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि श्री मार्गेश्र्वर क्रिडा मंडळ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न

मालवण

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ -हडी व ग्रामस्थ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा हडी – नं.२ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी सरपंच महेश मांजरेकर, पुजा तोंडवळकर, जीजी हडकर, भाई मुणगेकर, रुपेश कावले व मार्गेश्वर क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण-देवगड चे समूह संघटक मनोज दुधवडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण -सचिव दत्ता पिंगुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण -खजिनदार सिद्धेश धुरी तसेच एस.एस.पी.एम. मेडीकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे कुडाळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ.जनार्दन बावणे, मनिष यादव, पूजा गुरव, प्रणया वळंजू, स्वप्नाली मेस्त्री, सुमित मुकादम व संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी पुजा तोंडवळकर, दीपाली सुर्वे, आर्या गावकर या तीन महिलांनीही रक्तदान केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.एस.कुलकर्णी यांनी मार्गेश्वर क्रीडा मंडळाचे व कार्यकर्त्यांचे आभार व अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + sixteen =