You are currently viewing पी. एफ. डॉन्टस

पी. एफ. डॉन्टस

पी. एफ. डॉन्टस

एक अभेद्य कारकीर्द खंबीर नेतृत्वाची ! समर्थ साथ शिलेदारांची!
सैन्यसेवा !! सैन्यातून निवृत्ती !! पुन्हा शासकीय सेवत दाखल !! तेथून स्वेच्छा निवृत्ती !! आणि संघटन, शिक्षण, पर्यटन, पत्रकारिता आदी माध्यमातून अखंड समाजसेवा !!

सैन्यदालाची कडक शीस्त आणि अत्यंत चाकोरीबद्ध जीवन जगलेला एक निवृत्त सैनिक एक बलशाली व परीपूर्ण संघटन उभारुन केवळ माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय नाही तर जातिधर्माच्या पलिकडे जावून समाजातील सर्व घटकांना न्याय हक्क, मान-सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा पाप्त करुन देवू शकतो असे कतृर्त्ववान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे पीटर फान्सिस डॉन्टस खरोखरच गौरवपात्र आहे !!
सैन्यदलातील निवृत्तीनंतर पी. एफ. डॅन्टस या नेतृत्त्वाने महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यात सेवेत असताना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करून, राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली ती आजही डौलाने ओरोस येथे उभी आहे.
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नाबाबतची जाणीव व आत्यंतिक तळमळ त्यांच्या सैनिकी रक्तातील संघटना नेतृत्त्वास स्वस्थ बसू देत नव्हती. विखुरलेल्या माजी सैनिकांना एकत्रित करुन जिल्ह्यात माजी सैनिक संघटनेची मूहुर्त मेढ रोवली. माजी सैनिक व त्यांच्या कुंटुंबियांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक मोर्चा, निवेदने, सभा, शिबीरे, मेळावे घेत शासनासी संघर्ष केला. त्यांनी इंडियन एक्स सव्हसेस लिग या संघटनेचे १५ वर्षे राज्य अध्यक्षपद तर राष्ट्रीय उपाध्यक्ष पद सलग १० वर्षे भूषविले. त्यांनी या संधीचे सोने करुन माजी सैनिकांचे वन रँक वन पेन्शन, घरफाळा माफी असे अनेक पश्न मार्गी लावले. जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या आथक उन्नतीसाठी त्यांनी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज जिल्ह्यात नंबर १ ची पतसंस्था म्हणून काम करत आहेत. खेडोपाडी विखुरलेल्या सैनिक पतसंस्थेच्या शाखा आज ग्रामविकासाचे मुख्य केंद्र बनू पाहताहेत. संघटनेच्या माध्यमातून जिल्हाभरात माजी सैनिक मंडळे, सैनिक भवने उभी केलीत. जिल्ह्यासाठी कॅन्टीन मंजूरीसाठी संघर्ष व पाठपुरावा केला. कान्होजी आंग्रे सुरक्षा रक्षक संस्था – भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशन अशा अनेक सहकारी संस्था रुजविल्या व त्या फुलविल्या. धडाडी,प्रयोगशीलता, नेतृत्त्व आणि दूरदृष्टीने त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय व संस्थेच्या संख्यात्मक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

कोकणातील हुशार व होतकरु तरुण शासन व सैन्यदलामध्ये अधिकारी व्हावेत यासाठी त्यांनी आंबोली येथे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या मिलिटरी पॅटर्नच्या शाळेची उभारणी केली. १००% यशाचा आंबोली पॅटर्न निर्माण करून ही सैनिक शाळा आज महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सैनिक शाळा म्हणून ओळखली जाते.

विखुरलेल्या ख्रिश्चन ज्ञातिबांधवांना एकत्रित करून कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून नामवंत अशा कॅथोलिक अर्बन को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषीत झाल्यानंतर जिल्ह्यातील पहिली सिंधुदुर्ग जिल्हा टुरिस्ट सेवा सहकारी पर्यटन संस्था स्थापन करण्याचा मान त्यांनाच. महाराष्ट्रातील तरुण – तरुणींना साहसी व नेतृत्त्व विकास प्रशिक्षण देणारी दि कर्नल्स ॲकॅडमी फॉर ॲडव्हेन्चर ॲण्ड ॲरो स्पोर्टस्, आंबोलीची निर्मिती केली. गेली पंधरा वर्षे ते साप्ताहिक सरहद्दचे संपादक म्हणून माजी सैनिकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत समाजाभिमूख पत्रकारिता करत आहेत.
समाजाच्या अभ्युद्यासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची राज्य व राष्ट्रीय पातळीवर नोंद घेवून त्यांना अनेक उच्चपदे, मान-सन्मान आणि सहकाररत्न, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड मॅनेजमेन्ट, न्यू दिल्ली तर्फे ज्वेल ऑफ इंडिया अशा अनेक पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. सदैव सैनिकांपुढेच जायचे या उक्ती प्रमाणे गेली सात दशके त्यांनी राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यामध्ये एका सरसेनापतीपमाणे कामगिरी केलेली आहे. इंडियन एक्स सव्हसेस लिग या संघटनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत एक प्रेरणास्रोत आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धडाडी, तल्लख दृष्टिकोन आणि प्रभावी वक्तृत्त्वामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी, बहुढंगी आणि बहुआयामी बनले आहे. त्यांच्या या अष्टपैलू गुणांमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात त्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे हे योगदान जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय माजी सैनिक संघटनेत सदैव लक्षात राहिल. अशा अनेक पातळ्यांवर या सिंधुदुर्गामध्ये आपला वेगळा असा एक ठसा निर्माण केला व एका खंबीर नेतृत्वाची झळाळी याच भूमीपूत्राने जाती धर्माच्या पलिकडे जावून एक अभेद्य भिंत निर्माण केली. त्यांचे हे काम असेच पुढे नेणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे आम्हांला वाटते. चला आपण सारे माजी सैनिक मिळून साहेबांचे हे कार्य पुढे नेऊया ! माजी सैनिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय माजी सैनिक संघटनेला अधिक बलशाली बनवूया !

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − two =