You are currently viewing जिथे आईवडिलांचा लळा तिथेच कुंभमेळा

जिथे आईवडिलांचा लळा तिथेच कुंभमेळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’जिथे आईवडिलांचा लळा तिथेच कुंभमेळा’*

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

***************************

एक तपाने कुंभमेळा येतो म्हणे

म्हणून माणसांचा लोंढा तिथे जातो

पाण्यात डूबकी मारून

सारे कर्म धर्म वाहू घालतो

 

तेव्हा स्वतःला असं वाटतं की

आता आपण स्वच्छ झालो

आणि पवित्र होवून निघालो

एका डूबकीत सारे पुण्य मिळवले

झाले गेले गंगेला ते वाहिले

 

कशाकरता माथी टिळा भस्म लावून

धार्मिक असल्याचं ढोंग करायचं

रामनामाच पांघरून अंगावर घेऊन

उगाचच तिर्थाटनला जायचं

 

अरै पाप पुण्याचा हिशोब चुकता करण्यासाठीच का

देवभक्त असल्याचा देखावा दाखवतात

होम हवन पारायणे करून काय

पुजा पाठ जप तप करतात

 

कितीही देवदर्शन करून आले तरी

पुन्हा तसंच माणूसकी सोडून जगायचं

ज्याला गरज भाकरीची असते

त्याला उपाशी परत पाठवायचं

 

तोंडात राम बगलेत सुरी ठेवणारेच

टाळचिपळी वाजवतात

पायी पायी तिर्थयात्रा करून

मंदिरात साष्टांग दंडवत घातलात

 

अरै कुठल्याही संगमात

कितीही डुबक्या मारल्या तरी

माणसाचा स्वार्थ स्वभाव सुटत नसतो

माणसाने स्वतःच्या देहात पाहिले ना

तर तिथेच देव दिसतो

 

खरतर माणूस लबाड तर

देव असतो साधा भोळा

ज्याच्या घरी आईवडिलांचा लळा

तिथेच दिसतो कुंभमेळा

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा