You are currently viewing मालवण येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती साजरी

मालवण येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती साजरी

मालवण :

संत शिरोमणी गुरु रविदास यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपत जातीभेद मिटवण्यासाठी सनातन हिंदू समाजाविरुद्ध बंड केले. अशा थोर विचाराच्या संताची ६४८ वी जयंती आज चर्मकार समाज उन्नती मंडळ शहर शाखा मालवण यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी संत गुरु रविदास यांची जयंती नगर, भरड मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रविदासांसारख्या संतांचे विचार आज प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. अशा या थोर संतांची शिकवण समाजाने अंगीकारून अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली द्यावी असे आवाहन संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकृष्ण पाडगांवकर यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन करून प्रास्ताविकात मंडळाचे सचिव देवेंद्र चव्हाण यांनी संत रविदास यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती दिली.

मालवण शहर चर्मकार समाज उन्नती मंडळ शहर शाखा मालवण मंडळाचे अध्यक्ष गणेश पाडगावकर, सचिव देवेंद्र चव्हाण ,माजी जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर माणगांवकर, तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष घनश्याम चव्हाण तसेच मार्गदर्शक श्रीकृष्ण पाडगांवकर, महिला सदस्य सौ. रुपाली अडवलकर, सौ. सुमन अडवलकर, सौ. प्रमिला माणगांवकर, दिपक भिलवडकर, दिपक माणगांवकर, विनायक भिलवडकर, संजय भिलवडकर, संतोष माणगांवकर, मिलिंद माणगांवकर, राजन माणगांवकर, नरेश चव्हाण, महादेव आडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्रीकृष्ण पाडगांवकर यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे सचिव देवेंद्र चव्हाण यांनी संत रविदास यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रभागअध्यक्ष श्री. घनश्याम चव्हाण यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा