You are currently viewing १८ फेब्रुवारी रोजी श्री देव घरवडकर वर्धापनदिनानिम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन

१८ फेब्रुवारी रोजी श्री देव घरवडकर वर्धापनदिनानिम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी  :

मळगांव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर वर्धापनदिन सोहळयानिमित्त मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी १० वाजता श्रीचे पूजन आणि होम हवन, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३:३० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सायंकाळी ६ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ सुश्राव्य प्रासादिक भजने, रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ हा पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळीचे घर येथील राऊळ कुटुंबीयांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा