You are currently viewing जलयुक्त शिवार योजनेतून भेकुर्ली गाव पाण्याने स्वयंपुर्ण करणार

जलयुक्त शिवार योजनेतून भेकुर्ली गाव पाण्याने स्वयंपुर्ण करणार

दोडामार्ग

जलयुक्त शिवार योजना राबवून भेकुर्ली गाव पाण्याने स्वंयपुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी सुक्ष्म आराखडा बनविण्यात येईल ,असा एकमुखी निर्णय आज झालेल्या बैठकीत ग्रामस्थांकडुन घेण्यात आला. दरम्यान या योजनेसाठी भेकुर्ली गावाची निवड केल्याबद्दल उपस्थित गावकर्‍यांनी शासनाचे आभार मानले तसेच यावेळी शिवार फेरी काढुन गावात मोहीमेबाबत जनजागृती करण्यात आली.
भेकुर्ली येथील श्री देव स्वयंभू मंदिरात ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =