स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आंदोलन तीव्र करणार,,,, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते!
उद्याच्या मोर्चात विज ग्राहकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले!
स्मार्ट प्रिपेड विज मिटर च्या विरोधात उद्या होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठकीत श्री पडते बोलत होते
यावेळी बोलताना श्री पडते म्हणाले राज्य सरकारने अदानी ला विज वितरण कंपनी जणु काही विकतच दिली आहे असे वाटते अनेक बिल टाकणारे व मीटर बिलींग घेणारे यांच्यावर बेकारीची कु-हाड आली आहेच याशिवाय स्मार्ट प्रीपेड मीटर ला मोबाईल सारखे रीचार्ज मारावे लागणार ही तर सर्व सामान्य विज ग्राहकांची फसवणूक असुन रीचार्ज सपंले कि लाईट बंद हा जो काही शाॅक अदानी राज्य सरकारच्या आशिर्वादांने सर्व सामान्य विज ग्राहकांना देणार आहेत या साठी आजच रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे असे श्री पडते यांनी सांगुन उद्याच्या मोर्चात सर्व सामान्य व व्यवसाईक यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री पडते यांनी केले आहे
यावेळी राज्य विज ग्राहक संघटनेचे राज्य निमंत्रक श्री संपत देसाई, सिंधुदुर्ग जिल्ह्या विज ग्राहक निमंत्रक श्री अतुल बंगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, दीपक जाधव व अन्य उपस्थित होते