You are currently viewing उत्कृष्ट गोपनीय अहवाल असलेल्या शिक्षकांना वेतन वाढ द्या – शिक्षक भारतीची मागणी

उत्कृष्ट गोपनीय अहवाल असलेल्या शिक्षकांना वेतन वाढ द्या – शिक्षक भारतीची मागणी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील अति उत्कृष्ट गोपनीय अहवाल असणाऱ्या शिक्षकांना वेतन वाढ व फरक मिळावा, अशी मागणी शिक्षण भारतीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. न्यायालयाने याबाबत शासनाला आदेश दिल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

शासनाने आगाऊ वेतनवाढी रद्द करण्याबाबतचा शासन आदेश २४ ऑगस्ट २०१७ रोजी निर्गमित केल्याने त्यापूर्वी अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणा-या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी लागू करणे आवश्यक आहे. अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच विविध न्यायनिर्णयांमध्ये न्यायालयानेही याबाबत शासनाला आदेशित केलेले आहे, असे पाताडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. इतकी वर्षे वाट पाहूनही आगाऊ वेतनवाढी लागू होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. तरी सदरच्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी देण्यात याव्यात अथवा न्यायालयात जाण्याची परवानगी तरी दयावी. अशी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, असे संतोष पाताडे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =