You are currently viewing प्रमोद जठारांच्या नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल:- आम. नितेश राणे

प्रमोद जठारांच्या नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल:- आम. नितेश राणे

वाढदिवसाच्या निमित्ताने कासार्डेत आयोजित कार्यक्रमात ग्वाही…

तळेरे : प्रतिनिधी

आमच्या सगळ्याची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आजच संकल्प करूया 2024 साली प्रमोद जठार यांच्या नावासमोरील माजी आमदार हा शब्द काढून टाकूया आणि त्यांच्या नावासमोर विद्यमान आमदार किंवा खासदार हा शब्द लागायलाच पाहिजे हा आमचा हट्ट आहे आणि तसेच होईल अशी ग्वाही आम. नितेश राणे यांनी कासार्डेत आयोजित कार्यक्रमात दिली.
माजी आम.प्रमोद जठार यांच्या ५७व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आम.नितेश राणे शुभेच्छा देताना बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आयुष्याच्या प्रवासात गाडी कुठे कुठे जाऊ शकते आणि कुठे कुठे थांबू शकते याचा अंदाज कुणालाच येत नाही..
प्रमोद जठार साहेबां सारखा दिलदार मनाचा नेता आणि अभ्मासू सहकारी आम्हाला लाभले.स्वच्छ मनाचा माणूस म्हणजेच प्रमोद जठार अशीच व्याख्या असून नाम.नारायणराव राणे प्रमाणेच कोकणचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून प्रमोद जठार कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहिले असे गौरवोद्गार आम. नितेश राणे यांनी काढून त वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी प्रमोद जठार यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर गोवा वास्कोचे नवनिर्वाचित आम दाजी साळकर, माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मनिष दळवी, अमेरिका स्थित डाॅ.अनिल नेरुरकर,
जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व सौ.निरजा
जठार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भला मोठा केक कापून प्रमोद जठार यांचा जंगी वाढदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला.

*…… आणि आम्ही दोघे एकजीव झालो!*

याप्रसंगी बोलताना प्रमोद जठार म्हणाले की, आमदार राणे आणि आम्ही बारा वर्षे आमने-सामने राहिलो पण, एक प्रसंग असा आला की, आम्ही दोघे एक जीव झालो…. यापुढेही जिल्ह्यात नामदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शतप्रतिशत करण्यासाठी आणि कोकणच्या आणि जनतेच्या विकासासाठी अविरत कार्यकरत राहु, मला जनतेने भरभरून दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही अशी प्रांजळ कबुली या निमित्ताने प्रमोद जठार यांनी दिली.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा, प्रमोद जठार मित्रमंडळ कासार्डे आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्यावतीने पुष्पहार आणि हापुस आंब्याचा हार घालून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी राजन तेली,
आम.दाजी साळकर, डॉ. अनिल नेरूरकर यांनीही मनोगत व्यक्त करत प्रमोद जठार यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
कासार्डे येथील निवासस्थानी माजी आम.प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.
या कार्यक्रमा दरम्यान ‘सोनी टीव्हीवरील ‘हास्य जत्रा’ मधील विनोदी कलाकार अभिनेते प्रसाद खांडेकर,जयवंत भालेकर,गौरव मोरे,हेमांगी कवि,वनिता खरात यांचा हास्यकल्लोळचा रंगारंग आणि पोट धरून हसविणारा, बहारदार कार्यक्रम सादर झाला.या कार्यक्रमाला गोड गळ्याची सुप्रसिद्ध गायिका सुहानी ठाकुर यांनी गायलेल्या विविध गाण्याने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
वाढदिवस सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश माळवदे यांनी केले.

कासार्डे:- माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करताना सोबत आम. नितेश राणे,आम.दाजी साळकर,माजी.आम.राजन तेली,मनिष दळवी व इतर मान्यवर व कार्यकर्ते

छाया:- दत्तात्रय मारकड

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − eight =