दिल्लीत भाजपची सत्ता येताच वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष
वैभववाडी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दिल्ली विधानसभेत मोठे घवघवीत यश संपादन केले आहे. दिल्लीत भाजपची सत्ता येताच वैभववाडी भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा.. विजय असो. अशा घोषणांनी भाजपा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वैभववाडी येथे विजय उत्सव साजरा करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, जेष्ठ पदाधिकारी सज्जनकाका रावराणे, माजी नगराध्यक्ष नेहा माईनकर, युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे, नगरसेविका श्रद्धा रावराणे, रविंद्र रावराणे, अतुल नारकर, प्रदीप नारकर, आशिष रावराणे, राजन तांबे, दिपक माईनकर, बंधु वळंजू, महेश चव्हाण, दाजी पाटणकर, संतोष महाडीक, समीर रावराणे, आनंद फोंडके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
