कांदळगाव देव रामेश्वराचा ९ पासून वेशी फिरणे कार्यक्रम
मालवण
कांदळगाव देव रामेश्वर देवस्थानचा पूर्वपार परंपरेनुसार चालत आलेला स्वयंभू देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे-परब मानकरी आणि रयत मंडळींसह वाजत-गाजत चतुःसीमा (वेशी फिरणे) कार्यक्रम ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ९ रोजी रामेश्वर मंदिर कांदळगाव येथून दुपारनंतर कोळंब मांगरी येथे प्रस्थान, १० रोजी देव महापुरुष येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर न्हिवे येथे प्रस्थान, ११ रोजी दुपारी न्हिवे येथे महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव सातेरी मंदिरकडे प्रस्थान, १३ रोजी सकाळी रवळनाथ मंदिरातून कांदळगाव-साळकरवाडी येथे प्रस्थान, तेथून पुन्हा माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, रवळनाथ मंदिराकडे प्रस्थान, १४ रोजी रवळनाथ मंदिर येथून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद, दुपारनंतर रामेश्वर मंदिर येथे रवाना होणार आहे.