विविध योजनांच्या लाभासाठी, गावातील सर्व सेतू केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे.– सौ.संजना आग्रे
शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे फोंडाघाट नंबर एक वर राहावे – कोकरे
फोंडाघाट
फोंडाघाट मधील शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा.–दिलीप पाटील
फोंडाघाट मध्ये ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी वितरणासाठी शेतकरी मेळावा संपन्न !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी–फोंडाघाट महसूल मंडळ- तलाठी ऑफिस मार्फत ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथे, फोंडाघाट शेतकरी बंधू भगिनींनी साठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत, आपला ७/१२उतारा आधार कार्ड शी लिंक करून फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.सदर मेळाव्याचे दिपप्रज्वलन तसेच शेतकरी बांधवांना फार्मर आयडी चे वाटप मा.सरपंच सौ.संजना संजय आग्रे, तसेच नायब तहसीलदार श्री कोकरे यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी महसूल अधिकारी श्री. दिलीप पाटील, मंडळ अधिकारी श्री. मोंडे, तलाठी श्री एस.बी. सावंत, ग्रामविकास अधिकारी श्री. जाधव, फोंडाघाट वि. सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे जेष्ठ शेतकरी श्री प्रकाश सावंत तसेच फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच फोंडाघाट मधील काॅमन सर्विस सेंटर चालक उपस्थित होते.यावेळी बोलताना सरपंच सौ. आग्रे मॅडम, नायब तहसीलदार श्री. कोकरे साहेब, श्री.दिलीप पाटील साहेब यांनी फोंडाघाट मधील शेतकरी बंधू भगिनींनी या शासनाच्या उपक्रमाचा जास्तीत लाभ घेऊन शासनाच्या पीएम किसान सन्मान, मुख्यमंत्री नमो किसान सन्मान योजना तसेच शासनाच्या विविध कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि फोंडाघाट मधील सर्व सी एस सी सेंटर चालकांनी उत्तम प्रकारे शेतकरी बांधवांना सेवा देऊन शासनाच्या उपक्रमाची जनतेमध्ये वाहवा मिळवावी जेणेकरून आपल्या सी एस सी सेंटरमध्ये आणखीन शासनाच्या विविध योजना आपल्या सेंटर मार्फत जनतेला सेवा देण्यासाठी शासन प्रोत्साहन देईल.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे….