You are currently viewing झाराप येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर…

झाराप येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर…

झाराप येथे मोबाईल कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर…

कुडाळ

ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीनां कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशानूसार दिवाणी न्यायालय, (क. स्तर) कुडाळ, व कुडाळ तालुका वकील संघटना यांचे वतीने आज सकाळी झाराप ग्रा.प. येथे मोबाईल वॅन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये ॲड.एस.एस. सावंत यांनी नागरीकांची मुलभूत कर्तव्ये, एडीआर पध्दती व त्याचे फायदे याविषयांवर व ॲड. रुपाली कदम यांनी समाजातील महिलांची सुरक्षा व गोपनीयता या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी बापूसाहेब फुंदे, पोलीस पाटील क्षमिका हरमळकर व इतर ४०-५० ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा