You are currently viewing सहज कधीतरी

सहज कधीतरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सहज कधीतरी*

 

सहज कधीतरी

येतं माझ्या मनात

निळ्या आभाळात

रंगसडा…

 

थेंब टपोरे

मेघात बसतात लपून

येतात सरीतून

कसे…

 

तेज:पुंज आदित्य

सांजेला होतो विभोर

चंद्राची कोर

उजळते…

 

प्राणी पक्षांची

शब्दाविना असते भाषा

जगण्याची दिशा

निसर्गानुसार…..

 

सहज कधीतरी

आयुष्याचे पुस्तक चाळावे

स्मृतीस आठवावे

गतकाळातील…

 

निवांत क्षणी

गावं कधी लिहावं

मोकळं करावं

मन….

 

सहज कधीतरी

नकोशा आठवतात घटना

दूर लोटताना

घालमेल..‌..

 

सहज कधीतरी

झोपाळ्यावर निवांत बसावे

आभाळ निरखावे

तारकांचे….

 

तुळशीपुढील दिवा

कधी वाऱ्याने थरथरतो

मनात आठवतो

भगवंत….

 

जीवनाचा सागर

शांत झाल्या लहरी

येतात कधीतरी

मनकाठावर….!!

 

 

•••°°°•••°°°•••°°°•••°°°•••°°°•••

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा