आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला

आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला

आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मालवण

युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर यांचे छायाचित्र टपाल तिकीटावर झळकला आहे. आचरा चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने युपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले होते. दरम्यान सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा साठी निवड झाली होती. टपाल विभागाने टपाल तिकीटावर त्यांचे छायाचित्र प्रकाशित करून केळकर यांचा सन्मान केला आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या सुब्रमण्य केळकर यांच्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा आचरा व चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. आचऱ्याचा सुपुत्र टपाल तिकीटावर झळकला आपल्या मुलाचा घरच्यांना अभिमान वाटतो, त्याचप्रमाणे गावच्या आणि जिल्ह्यातील प्रत्येकाला अभिमान वाटतो. याच अभिमानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टपाल कार्यालयाने सुब्रमण्य केळकर यांचा फोटो असलेली टपाल तिकिटे छापलेली आहेत. स्वतःच्या फोटोचे तिकीट काढण्यासाठी टपाल कार्यालयात अर्ज करून ती सुविधा प्राप्त करू शकतो यासाठी टपाल खात्याची विशेष योजना असते मात्र विभागीय लेखापाल सिंधुदुर्ग टपाल विभाग विवेक वायंगणकर यांनी युपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७ वा क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन करणाऱ्या आचरा चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याच्या फोटोचे तिकीट काढून विशेष सन्मान केला आहे. नातेवाईकांनी पाठवले पहिले पत्र एके दिवशी पुण्यातील सुब्रमण्य केळकर हे वसतिगृहावर असताना त्यांच्यासाठी एक पत्र आले जे त्यांच्या वहिनी मंजिरी यांनी पाठवलेले होते. आणि त्या पत्रावर चक्क त्यांचा फोटो असलेले तिकीट लावलेले होते. स्वतःचा फोटो असलेले तिकीट लावून आपल्यालाच पत्र येणे ही आनंदाचीच गोष्ट होती.आपण न सांगता दुसऱ्या व्यक्तीने पुढाकार घेऊन असे तिकीट काढणे हे इतरांचे आपल्यावरील प्रेमच आहे. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची पद्धत कमी होत असताना माझ्यासाठी आलेले हे ‘पहिले’ कौटुंबिक पत्र होते, ते वाचूनही आनंद झाला. हे असे पत्र पाठविण्याची कल्पना माझ्या वहिनीची होती, त्यामुळे तिला धन्यवाद दिलेत. तसेच माझा फोटो असलेले तिकीट काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या विवेक वायंगणकर यांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा