You are currently viewing नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत वामनराव महाडीक महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत वामनराव महाडीक महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग अंतर्गत वामनराव महाडीक महाविद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

तळेरे

“तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, जय हिंद!”अशा अनेक घोषणांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नवी ऊर्जा भरणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग व वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी नेताजींच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना अगदी ओघवत्या शैलीत दिली. प्रशालेत जयंतीनिमित्त १) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातील प्रेरक प्रसंग व २)नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशसेवा कार्य या दोन्ही विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे १) अंकिता शिंदे २) वैष्णवी चव्हाण ३) आयुष सुतार. बक्षीस वितरण सोहळयादरम्यान विद्यार्थ्यांना चहा व नाश्त्याची सोयही करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे प्राध्यापक सचिन शेटये यांनी केले. सदर कार्यक्रमास शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा