You are currently viewing आसोली न्हैचीआड – पाल नवीन तलाठी सजा प्रश्नी भाजपाच्या वतीने तहसीलदारांचे लक्ष वेधले

आसोली न्हैचीआड – पाल नवीन तलाठी सजा प्रश्नी भाजपाच्या वतीने तहसीलदारांचे लक्ष वेधले

*न्हैचीआड महसुली गाव हे पुर्वीप्रमाणे आसोली तलाठी सजा मध्ये सामाविष्ठ करावे – भाजपाची मागणी*

वेंगुर्ला :

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्त अधिसूचनेद्वारे न्हैचीआड व पाल ही नवीन तलाठी सजा करणे बाबत प्रारुप अधिसूचना ग्रामपंचायत आसोली यांना देण्यात आली आहे.

खरे तर न्हैचीआड महसुली गाव हा आसोली ग्रामपंचायत चा भाग आहे. तसेच न्हैचीआड मधील शेतकरी कुटुंबाना सोसायटी तसेच रेशन दुकानासाठी आसोली येथे जावे लागते. न्हैचीआड येथील मुले शिक्षणासाठी आसोली हायस्कूल मध्ये जातात. तसेच न्हैचीआड मधील सर्व शेतकऱ्यांचे जमीनीचे क्षेत्र हे आसोली असुन त्यासाठी त्यांना आसोली मध्ये यावे लागते . न्हैचीआड मधील ग्रामस्थांना व वयोवृद्ध व्यक्तींना न्हैचीआड पासून पाल पर्यंत जाणेसाठी वहातुकीची सोय नसल्यामुळे व न्हैचीआड ते आसोली यामध्ये दळणवळणाची सोय असल्याने भौगोलिक – आर्थिक – सामाजिक दृष्ट्या आसोली सजा हाच उपयुक्त आहे. त्यामुळे आसोली सजा कायमस्वरुपी ठेवण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात तहसीलदार ओंकार ओतारी साहेबांची भाजपा च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, आसोली उपसरपंच संकेत धुरी, जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे, फकीर महमद दाऊद नाईक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे तातडीने प्रस्ताव सादर केला जाईल असे अभिवचन तहसीलदार, वेंगुर्ले यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा