You are currently viewing पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करावी.

पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करावी.

– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी 

“पोष्टिक तृणधान्य वर्ष” या संकल्पनेअंतर्गत ” कृषि विभागाने इतर विभागाच्या सहकार्याने महिना निहाय विविध उपक्रम आयोजित करावेत. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी या पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करावी. नागरिकांनी पौष्टीक तृणधान्याच्या आहारातील वापराबाबत जागरुक राहून त्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

            जिल्हाधिकारी कार्यालयात भरडधान्य आढावा बैठक संपन्न झाली.  यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस. दिवेकर, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी व्ही. व्ही. अंधारी, यांच्यासह विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

            संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्याप्रमाणे सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात येत आहे. भारत हा जगातील पौष्टिक तृणधान्य पिकवणारा एक प्रमुख देश आहे. यानिमित्त देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सर्व स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी  यावेळी दिल्या.

             जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी  विषय वाचन करुन कृषि विभागात सुरु असलेल्या योजनाचा आढावा सादर केला. तसेच कृषि विभागामार्फत राबविण्यात सन 2023 या वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कृषि महोत्सव आयोजित करणे, कार्यशाळा आयोजित करणे,विविध सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने कार्यक्रम करणे.पौष्टिक तृणधान्य दालन उभारणे, शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम उपक्रम राबविणे, मिलेट ऑफ दि मन्थ संकल्पना अंमलात आणणे.जानेवारी-बाजरी,फेब्रुवारी- ज्वारी,ऑगस्ट- राजगिरा,सप्टेंबर – राळा, ऑक्टोबर- वरई,डिसेंबर -नाचणी इत्यादी. प्रभात फेरी, रोड शो, बाईक रैली व्दारे प्रचार करणे, मिलेट दौडचे आयोजन करणे,पाककृती,पाककला स्पर्धाचे आयोजन करणे,शालेय शिक्षण विभागामध्ये पौष्टिक तृणधान्य विषयक स्पर्धेचे आयोजन करणे,आरोग्य सर्व शासकिय विभाग, अशासकिय संस्था अणि जनतेने पौष्टीक तृणधान्याच्या आहारातील वापराबाबत जागरुक वाढविणे इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा