करिअर घडविण्याची संधी अप्लाइड आर्टमध्ये : केदार बांदेकर
सावंतवाडी :
आवड आणि छंद जोपासताना व्यावसायिक जोड देत आपले करिअर घडविण्याची संधी अप्लाइड आर्टमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडताना योग्य निर्णय घेण्याची संधी उपलब्ध होईल. या शिबिराचा फायदा आपल्याला भविष्यात नेमके काय करायचे आहे ते करण्याचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल असा विश्वास डी जी बांदेकर ट्रस्ट चे अध्यक्ष गोविंद उर्फ केदार बांदेकर यांनी व्यक्त केला. बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट , डी जी बांदेकर ट्रस्टच्यावतीने सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री बांदेकर बोलत होते.यावेळी प्राचार्य उदय वेले,प्रा.सिध्देश नेरूरकर, प्रा.तुकाराम मोरजकर ,चेतन जगताप, प्राजक्ता वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
उदय वेले म्हणाले, माझा तीस वर्षाचा अनुभव आहे. करीअर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आवडेल. विद्यार्थी विविध परिसरातील असतात त्यामुळे समन्वय, संवाद होतो. आजच्या घडीला अनेक मान्यवर या क्षेत्रात आहेत. प्रत्येक क्षेत्रात कलात्मक पद्धतीने डिझाईन करण्याची संधी आहे. प्रत्येक पातळीवर कलाकार लागतात. मनापासून तुम्ही ही संधी साधुन काम केले तर अतिशय सुंदर काम करु शकता. सिनेमा, वृत्तपत्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना चित्र कलाकारांची गरज असते. पॅकेजींग, डिझाईन उद्योग मध्ये देखील संधी आहे. तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करून कौशल्य दाखविले तर फार मोठा प्रभाव टाकू शकता.यावेळी प्राचार्य उदय वेले,प्रा. सिध्देश नेरुरकर, प्रा तुकाराम मोरजकर यांनी चित्रकार म्हणून वावरत असताना व्यावसायिक जोड दिली पाहिजे त्याबद्दल विविध पातळ्यांवर यशस्वी चित्र, माॅडेल विद्यार्थ्यांना दाखवत मार्गदर्शन केले. यावेळी चेतन जगताप यांनी स्वागत केले.