You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला आजी-माजी नगरसेवकांची साथ मिळाली तर शहर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनवू शकतो- रवी जाधव

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला आजी-माजी नगरसेवकांची साथ मिळाली तर शहर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनवू शकतो- रवी जाधव

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला आजी-माजी नगरसेवकांची साथ मिळाली तर शहर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनवू शकतो- रवी जाधव

पाच वर्षे मागे गेलो तर या सुंदरवाडी शहराची एक स्वच्छ व सुंदर सावंतवाडी शहर म्हणून ओळख होती.
शहराचा विकास, आरोग्य विषय समस्या, शहर स्वच्छता, मोती तलाव, रस्ते ,पाणी, नाले, गटारे तसेच नगरपालिका अंतर्गत कागदपत्र असुविधा याबाबत जनतेच्या अनेक तक्रारी दिवसान दिवस वाढतच गेल्या.
प्रशासक बसल्यानंतर प्रशासकावर अंकुश ठेवणारा नगराध्यक्ष – नगरसेवक तसेच आमदार दीपक भाई केसरकर यांचा थोडाफार दुर्लक्ष झाल्या करणे येथील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या स्थिती अत्यंत कठीण आहे जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
परंतु सदर परिस्थिती अजून बिकट होऊ नये म्हणून आपल्या सुंदरवाडीचा विचार करून आजी-माजी नगरसेवक यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला सोबत घेऊन शहरातील विविध समस्या बाबत विचार विनिमय करून सावंतवाडी शहर पुन्हा स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे नम्र आवाहन सामाजिक बांधिल प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा