You are currently viewing कासार्डेतील जयराम मुणगेकर यांचे निधन

कासार्डेतील जयराम मुणगेकर यांचे निधन

कासार्डे :

कासार्डे तिठ्ठा येथील श्री. जयराम जगन्नाथ मुणगेकर याचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले.मूळ कातवण ता. देवगड येथील श्री.जयराम मुणगेकर यानी कासार्डे येथे येवून कोकण ट्रान्स्पोर्ट कंपनीची स्थापना करून व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करीत असताना त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी कधीच ते विसरले नाहीत.त्यांनी अनेक गरजूंना मदतकार्य कार्य करत समाजिक बांधिलकी सातत्याने जोपासली होती.
मात्र गेली काही वर्षे आजारी असल्याने ते घरीच उपचार घेत होते.

त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,पुतणे,पुतणी,भावजय,सुना, नातवंडे असा परीवार असून कासार्डे येथील रमेश मुणगेकर, कासार्डेतील ज्युदो-कराटेचे प्रशिक्षकव पंच राकेश मुणगेकर यांचे ते वडील तर, किरण मुणगेकर यांचे काका होते. निधनानंतर कासार्डे व्यापारी संघटनेने दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − three =