You are currently viewing कणकवली तालुका काँग्रेसच्या सहकार सेलच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय रेवडेकर यांची नियुक्ती.

कणकवली तालुका काँग्रेसच्या सहकार सेलच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय रेवडेकर यांची नियुक्ती.

कणकवली तालुका काँग्रेसच्या सहकार सेलच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय रेवडेकर यांची नियुक्ती.

कणकवली

कणकवली तालुका काँग्रेसच्या सहकार सेलच्या अध्यक्ष पदी दत्तात्रय रेवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, यांच्या सूचनेनुसार त्यांची ही निवड करण्यात आली आहे. .त्यांच्या तालुका काँग्रेसच्या सहकार सेलच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आदरणीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेले काँग्रेस पक्षाला जनाधार प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करु, असे निवडीनंतर दत्तात्रय रेवडेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा