You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत एकूण एकोणीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता दुसरी मधील ‘ वीर दादासाहेब शिंदे ‘ याने सुवर्णपदक पटकावले व इयत्ता पहिली मधील ‘ गिरीश विनायक कुडकर ‘ याने विशेष प्राविण्य पातळीवर विजय प्राप्त केले. त्याचप्रमाणे , सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय सहा. शिक्षिका सौ. नफिसा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा