शेतीचे पाणी बंद झाल्यामुळे साटेली भेडशीतील ग्रामस्थ आक्रमक…
अन्यथा नुकसान भरपाई द्यावी लागेल; तिलारीच्या अधिकाऱ्यांना इशारा…
दोडामार्ग
तिलारी धरणाचा कालवा फुटल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज तिलारीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी एक तर तात्काळ कालव्याचे काम करा, अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली. यावेळी तात्काळ काम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
धरणाचा कालवा शुक्रवारी फुटला आहे. त्यामुळे उत्तर गोव्याला जाणारे कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. परिणामी साटेली-भेडशी परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांची उन्हाळी शेती अडचणी झाली आहे. त्यात कडधान्य पिकाचे नुकसान होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तात्काळ या कालव्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी घेऊन आज परिसरातील महिलांनी तिलारीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी नम्रता धर्णे, शोभा पडते, सीताबाई धर्णे, सुजाता धर्णे, लतिका धर्णे, सुनीता धर्णे, शुभांगी धर्णे, अमोल धर्णे, प्रभाकर राणे आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तात्काळ कालव्याचे काम करा, अन्यथा नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली. यावेळी रविवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.