You are currently viewing सावंतवाडी उभा बाजार येथे बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

सावंतवाडी उभा बाजार येथे बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न

पोलीस घटनास्थळी दाखल : तपास सुरू

सावंतवाडी

सावंतवाडी उभा बाजार येथील बाळकृष्ण टंगसाळी यांचे बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी आज पहाटे केला. रस्त्यालगत असलेल्या या घराचे कुलूप कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोर घरात शिरले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. टंगसाळी कुटुंब हे मुंबईला असतात त्यामुळे घर बंद होते. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी त्या बंद घरात डल्ला मारण्याचा प्रयत्न केला.

सकाळी गटारात कुलूप पडल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाहिले असता दरवाजा उघडल्याचे उघडकीस आले. त्याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − 1 =